महेंद्र वाकपैजण महावितरणकडून सन्मानित

। श्रीवर्धन । आनंद जोशी ।
अभियंता दिनी महावितरणचे श्रीवर्धन कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता महेंद्र वाकपैजण यांना महावितरणतर्फे उत्कृष्ट अभियंता म्हणून मुख्य अभियंता, भांडुप नागरी परिमंडळ सुरेश गणेशकर यांचे हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. निसर्ग वादळामध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल, कोव्हिड काळात ग्राहकांस दिलेल्या अखंड सेवेबद्दल, तसेच कंपनीचा महसूल चांगल्या प्रकारे वसूल केल्याबद्दल वाकपैजण यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. वाकपैजण यांचे अनेक नागरिक, वीज ग्राहकांकडून अभिनंदन करण्यात आले.निसर्ग चक्रीवादळानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार वाकपैजण यांनी व त्यांच्या सर्व सहकार्‍यांनी अहोरात्र कामे करुन ग्राहकांना शक्य तितक्या लवकर वीज पुरवठा सुरू करुन दिली.

Exit mobile version