महेश शिंदे यांना शिवीगाळ

पत्रकारांकडून निषेध कारवाईची मागणी

| महाड | वार्ताहर |

महाड शहरातील पत्रकार महेश शिंदे यांना क्षुल्लक कारणावरून महाडमधील एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आणि माजी नगरसेवक दीपक सावंत आणि त्याचा मुलगा सुरज सावंत यांनी शिवीगाळ आणि जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत महाड शहर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली असून दीपक सावंत आणि त्यांचा मुलगा सुरज सावंत यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी महाडमधील सर्व पत्रकारांनी केली आहे.

महेश शिंदे आणि सोबतचे पत्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात अधिकार्‍यांना भेटण्यासाठी गेले होते. मात्र याठिकाणी अधिकारी उपलब्ध नव्हते. त्यामुळे त्याठिकाणी उपस्थित असलेले पाटील नामक कर्मचार्‍याजवळ साधक बाधक चर्चा सुरू होती. त्यादरम्यान लाडवली गावामध्ये मद्य विक्री परवाना करता दोन अर्ज आले आहेत याबाबत काय झाले असे महेश शिंदे यांनी विचारले. संबंधित कर्मचार्‍याने आपल्याला ही माहिती उपलब्ध नाही असे सांगितल्याने महेश शिंदे आणि अन्य पत्रकार तिथून निघून आले. मात्र संबंधित कार्यालयातील कर्मचारी पाटील यांनी दीपक सावंत यांना महेश शिंदे यांच्या बाबतीत गैरसमज निर्माण करून देत महेश शिंदे सातत्याने तुमच्या परवानाबाबत विचारणा करत आहेत असे सांगितले. यामुळे दीपक सावंत यांनी महेश शिंदे यांना दिनांक 29 मार्च रोजी दूरध्वनी द्वारे शिवीगाळ आणि धमकी दिली त्याचप्रमाणे दीपक सावंत यांचा मुलगा सावंत हा देखील महेश शिंदे यांच्या घरी गेला आणि उद्धटपणे दादागिरीची भाषा केली. यामुळे महेश शिंदे यांचे कुटुंब पूर्णपणे घाबरले याबाबत महेश शिंदे यांनी महाड पत्रकार संघ तसेच अन्य पत्रकारांशी चर्चा केल्यानंतर याबाबत सर्व पोलीस तक्रार दाखल करावी असा निर्णय घेण्यात आला.

यावेळी महाड पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश पवार महाड प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रवीण कुलकर्णी रायगड जिल्हा प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे यांसह जवळपास वीसहून अधिक पत्रकार उपस्थित होते.

Exit mobile version