खिस्ती बांधव व भगिनींची मोठी उपस्थिती
। रेवदंडा । वार्ताहर ।
रेवदंडयातील ऐतिहासीक काळाच्या स्मृती जागविणारा पोतृगिज कालीन माय-दे-देउस यात्रा मोठया उत्साहात संपन्न झाली. या उत्सवाचे निमित्ताने मुरूड तालुक्यातील कोर्लई व संपुर्ण महाराष्ट्रात विखुरलेल्या ख्रिस्ती बांधव व भगीनीची मोठी उपस्थिती होती.
रेवदंडा गोळा स्टॉप नजीक कोर्लईच्या ख्रिस्ती बांधव व भगीनीचे श्रध्दास्थान असलेले प्राचीन माय-दे-देउस मंदिर आहे. या मंदिरात प्रतिवर्षी फक्त (दि.5) मे या दिवशीच मोठी उत्सव यात्रा संपन्न झाली. कोर्लई येथील ख्रिस्ती बांधव व भगीनीसह मोठया संख्येने विखुरलेले ख्रिस्ती बांधव व भगीनी यांच्या उपस्थितीत मोठया उत्साहाने माय-दे-देउस मंदिरात श्रध्दा व भाविकतेने उत्सव साजरा करण्यात आला. गेले महिनाभर पारंपारीक पध्दतीने कोर्लई येथून रेवदंडा माय-दे-देउस मंदिरात चालत येउन मोठया भक्तीने पूजाअर्चा ख्रिस्ती बांधव व भगिनींने केली.
माय-दे-देउस उत्सवाचे दिवशी मंदिरात पूजाअर्चा, प्रार्थना व आरतीचा कार्यक्रम सकाळी 9 वाजण्याचे सुमारास संपन्न झाला, त्यानंतर रितीरीवाजाप्रमाणे माय-दे-देउस मातेची पालखी रेवदंडा बाजारपेठेतून काढण्यात आली. रेवदंडा बाजारपेठेत असंख्य ख्रिस्ती बांधव व भगिनीसह माय-दे-देउस मातेची शिस्तंबध्द पालखी सोहळा पहाण्यासारखा असतो. रेवदंडा बाजारपेठेतून थेट विठोबा आळी मार्गे पुनस्यः मातेच्या मंदिराकडे पालखी सोहळा प्रस्थान करतो. माय-दे-देउस मंदिर प्रांगणात ख्रिस्ती बांधव कोर्लई चर्च फादर यांचे मार्गदर्शनाखाली सत्कार सोहळा आयोजीत करण्यात आला होता. यावेळी विविध स्तुत्य उपक्रमासह मान्यवर ख्रिस्ती बांधवाचा सत्कार करण्यात आला.