मायनाक भंडारी चषक क्रिकेट स्पर्धा

स्पृहा 11 किहीम पुरस्कृत भंडारी फायटर्स विजेता

| रेवदंडा । वार्ताहर ।

भंडारी बहुउद्देशीय सामाजिक संस्था, अलिबागच्या वतीने राज्यस्तरीय मायनाक भंडारी चषक 2023 पर्व 2 या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदरील स्पर्धा अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील हरेश्‍वर क्रिकेट मैदानाच्या भव्य पटांगणावर 7, 8 जानेवारी दरम्यान संपन्न झाली. अंतिम सामना स्पृहा 11 किहीम पुरस्कृत भंडारी फायटर्स श्रीवर्धन व भंडारी योद्धा जय हनुमान कातळपाडा यामध्ये खेळविण्यात आला. यात स्पृहा 11 किहीम पुरस्कृत भंडारी फायटर्स श्रीवर्धन हां संघ अजिंक्य ठरला.

स्पर्धेमध्ये एकूण आठ संघांनी सहभाग नोंदवला व राज्यातील 160 खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक 1,00,000 रूपये अलिबागमधील राजन नार्वेकर यांनी दिले. द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक 50,000 रूपये मुरबाड नगर पंचायतीचे विद्यमान नगरसेवक विनोद नार्वेकर यांनी दिले. तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक 25000 रूपये नागावचे माजी सरपंच नंदकुमार मयेकर यांनी दिले. स्पर्धेतील मालिकाविरासाठी वॉशिंग मशीनचे बक्षिस प्रशांत चिंबुलकर यांनी दिले. स्पर्धेतील प्रथम, द्वितीय, तृतीय, क्रमांकाची आकर्षक चषकं कै. प्राची रमेश पाटील ह्यांच्या स्मरणार्थ समिहा साहिल पाटील यांच्याकडून देण्यात आली.

सदर स्पर्धेसाठी नाना तोडणकर, राजन नार्वेकर, नंदकुमार मयेकर, रमेश पाटील, निखिल मयेकर, महेश नार्वेकर, नितिन नार्वेकर, प्रकाश पारकर, क्रांती जाधव, समिहा पाटील, अविनाश मसुरकर, भास्कर चव्हाण, मोहन खोत, शिवप्रसाद तोडणकर, संतोष किर, रोहन तोडणकर, संतोष मोरे, राजन वाडकर, प्रफुल्ल मोरे, विलास शिवलकर, दिपक खोत, संतोष कनगुटकर, संजय मांजरेकर, राजु शिंदे, राजू शिलधनकर, सुरेश खोत, प्रशांत जाधव, संदीप खोत, दर्शन पारकर, अक्षय गुळेकर, अश्‍विनकुमार पाटील, प्रशांत चिंबुलकर, साईल पाटील, विलास आंब्रे, सचिन कदम उपस्थित होते.

Exit mobile version