सामाजिक बांधिलकी जपणारे जयदीप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

| नेरळ | वार्ताहर |

कर्जत तालुक्यात नेरळ या गावामधील जयदीप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचे यंदाचे 35 वे वर्ष आहे. या मंडळाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविले जात असून वही पेन यांचा नैवेद्य स्वीकारणारे हे मंडळ वर्षभरात अनेक सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपत असतात. दरम्यान,पूर्वेचा राजा म्हणून येथील बाप्पा ओळखला जातो. मुंबईमधील रुईया महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. सू.ना. देशपांडे यांनी नेरळ पूर्व येथे जयदीप मित्र मंडळाची स्थापना केली आणि याच मंडळाच्या माध्यमातून 1990 मध्ये जयदीप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली.


मंडळाने कोरोना सारख्या भयंकर महामारीचा मंडळाने अशा परिस्थितीतही कोरोना लसीकरण शिबीर आणि वेगवेगळे आरोग्य शिबीर भरवून लोकांची मदत करण्याचा प्रयत्न केला.तर ग्लोबल वॉर्मिंग विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा जो ऱ्हास होत आहे, तो रोखण्यासाठी पर्यावरणाचा रक्षण करण्याच्या हेतुने मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वृक्षरोपण केले आहे. पर्यावरण जपणारे आणि समाजात बांधिलकी जपणारे मंडळ म्हणून नेरळ येथील जयदीप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आपली प्रतिमा तयार केली आहे.

Exit mobile version