। अलिबाग । प्रतिनिधी ।
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवारी भीषण अपघात झाला. या अपघातात 4 जणांचा मृत्यू तर 8 जण जखमी झाले. जखमींपैकी तिघेजण गंभीर असून जखमींना कामोठे येथे दाखल केले आहे. ट्रक, कंटेनर, स्विफ्ट, आयशर टेम्पो, व्हेन्यु कार गाड्यांचा अपघात झाला. या अपघातात सोलापुर जिल्ह्यातील तिघे तरुण तर तुळजापुर येथील एक तरुण जागीच ठार तर जालना जिल्हातीन तिघे जण किरकोळ जखमी. यात स्वीफ्ट कार मधील गौरव गौतम खरात, सौरभ तुळसे, सिद्धार्थ मल्लीक राजगुरु, जि. सोलापुर व मयुर दयानदं कदम रा. तुळजापुर हे जागीच ठार झाले तर पवन अग्रवाल, मितेश वडोदे, अस्लम शेख तिघे ही रा. जालना, वेन्यु कार मधील प्रवासी किरोळ जखमी आहे.
ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने पाच वाहनांचा अपघात घडला आहे. या अपघातात एमएच 46 एआर 3877 या कंटेनरने पुढे जाणार्या एमएच 13 बीएन 7122 या स्वीफ्ट कारला धडक दिली. या कारमधील प्रवाशांचा मृत्यू झाला. स्विफ्ट कार एमएच 10 एडब्ल्यू 7611 या पुढे जणार्या आयशर टेम्पोमध्ये घुसली. टेम्पोने पुढे जाणार्या एमएच 21 बीओ 5281 या पुढील कारला जोरदार धडक दिली. या कारमधील तीन प्रवासी रा. जालना किरकोळ जखमी झाले आहेत. वेन्यु कारने पुढे जाणार्या कंटेनर एमएच 46 बीएम 5254 जोरदार धडक दिली. या अपघातात स्विफ्ट कारमधील 4 जणांचा मृत्यू झाला आहे. पेट्रोलिंग डेल्टा फोर्स पोलीस व अपघातग्रस्त टीम मदत करीत आहे.