राज्यात ईडीची मोठी कारवाई; एकूण 70 स्थावर मालमत्ता जप्त

। मुंबई । वृत्तसंस्था ।

राज्यात ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ईडीकडून 315 कोटींच्या 70 स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयने काही महिन्यापूर्वी गुन्हे दाखल केले आहेत. त्या आधारावर ईडीकडून मनीलाँड्रीग प्रकरणी तपास सुरू होता. या तपासात मनी लाँड्रींग झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ही जप्तीची कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

राजमल लाखीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर एल गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड व मनराज ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि इतरांच्या बँक फसवणूक प्रकरणात ही जप्ती करण्यात आली आहे. ईडीने जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड आणि कच्छमधील 70 स्थावर मालमत्ता आणि जंगम मालमत्ता तात्पुरत्या स्वरुपात जप्त केल्या आहेत. दि.13 रोजी पीएमएलए, 2002 अंतर्गत ही कारवाई करण्यात आलेली आहे.

Exit mobile version