• Login
Friday, May 23, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

संक्रांतीचे संक्रमण – प्रकाशपूजेचे सूत्र!

Varsha Mehata by Varsha Mehata
January 14, 2024
in संपादकीय, संपादकीय लेख
0 0
0
…तर पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकू!
0
SHARES
124
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

वैष्णवी कुलकर्णी

संक्रातीचा सण म्हणजे एका प्रकाशपर्वाची सुरूवात. अंधाराकडून उजेडाकडे नेणारा, रात्रीचे प्रहर कमी करुन दिवसकाळ वाढवणारा हा सण संक्रमणकाळ असतो. यात ऋतूबदल होतोच; खेरीज माणसाच्या नित्य उपचारांमध्येही काही बदल घडणे अपेक्षित असते. हे सर्व संकेत देणारा संक्रांतीचा सण एकमेकांप्रती स्नेह जपण्याची आणि ऋणानुबंध दृढ करण्याची शिकवणही देतो. आजच्या काळात ती अधिक महत्त्वाची ठरते.

संक्रातीचा सण म्हणजे एका प्रकाशपर्वाची सुरूवात. अंधाराकडून उजेडाकडे नेणारा, रात्रीचे प्रहर कमी करुन दिवसकाळ वाढवणारा हा सण संक्रमणकाळ असतो. यात ऋतूबदल होतोच; खेरीज माणसाच्या नित्य उपचारांमध्येही काही बदल घडणे अपेक्षित असते. हे सर्व संकेत देणारा संक्रांतीचा सण एकमेकांप्रती स्नेह जपण्याची आणि ऋणानुबंध दृढ करण्याची शिकवणही देतो. आजच्या काळात ती अधिक महत्त्वाची ठरते.

बदल हा काळाचा स्थायी भाव असला तरी मानवी स्वभाव आणि त्याची वैशिष्ट्ये मात्र सहजासहजी बदलत नाहीत. त्यामध्ये लक्षणीय बदल होण्यास बराच वेळ जावा लागतो. मातीच्या घड्याला आकार देताना कुंभार हलक्या हाताने थापड्या मारतो त्या पद्धतीने काळाच्या थापड्या सहन केल्याखेरीज माणसाला शहाणपण येत नाही. त्यामुळेच एकीकडे भरकटलेल्या मन, वृत्ती आणि विचार ताळ्यावर ठेवण्यासाठी एक तर अनुभवांची गरज असते किंवा संस्कारांमधून मिळालेली शहाणपणाची साथसंगत आवश्यक असते. काही काळ वापर केल्यानंतर एखाद्या निर्जीव यंत्रालाही देखभाल, दुरुस्तीची गरज भासते, तशीच एकमेकांच्या सानिध्यातून समजलेल्या बऱ्या-वाईट गुणवैशिष्ट्यांमुळे उबग आलेली, काहीशी मलूल वा मलीन झालेली नाती पॉलिश करण्याच्या भावनेने भरलेला एक हात फिरावा लागतो. वर्षभर साजऱ्या होणाऱ्या सणांद्वारे नेमका हाच हेतू साध्य होतो. संक्रांत त्याला अपवाद कसा असेल…!

सध्या नात्यांची वीण उचवण्याचे प्रमाण वाढले आहे. विभक्त कुटुंबपद्धतीने सख्खी, जीवाभावाची नातीही दूरच्या ध्रुवांवर नेमकी ठेवण्याची कला माणसाला प्रदान केली आहे. कारणाशिवाय भेटणे, लाभाशिवाय संबंध  जोपासणे आणि गरजेशिवाय एकमेकांकडे जाणे जवळपास संपुष्टात आले आहे. व्यस्तता आणि व्यग्रतेच्या नावाखाली ऋणानुबंधाच्या गाठी जपण्यात मागे राहणारी पिढी सोशल मीडियाशी जोडलेली गाठ मात्र कसोशीने जोपासते तेव्हा माणसा-माणसातील कमी होणाऱ्या भावनिक ओलाव्याबाबत काळजी वाटल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच नात्यातील गोडी वाढवणारा संक्रांतीसारखा सण आज अधिक महत्त्वाचा आणि गरजेचा वाटतो.

 तिळावरचा काटेरी मोहोर, तिळवड्यांची स्निग्धता, गुळपोळीचा खरपूस सुगंध, बाजरीच्या भाकरीतला किंचीतसा  कडवटपणा, भोगीच्या निमित्ताने केली जाणारी लेकुरवाळी भाजी, घरोघरी साजरी होणारे हळदी-कुंकवाचे कार्यक्रम, बोरन्हाणासारखे विधी, पतंग उडवण्यासाठी घाई करणारे बालगोपाळ या सर्व आनंदोत्सवाचे एक नाव म्हणजे मकरसंक्रांती! परस्परांना गोड बोलण्याचे आर्जव करणारा, आवाहन करणारा आणि या निमित्ताने स्नेहीजनांना एकत्र आणणारा हा उत्सव संपूर्ण भारतात अगदी उत्साह आणि आनंदात साजरा होतो. या दिवसापासून सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि पृथ्वी परिभ्रमणाची दिशा बदलते. लांबलेल्या रात्री उत्तरोत्तर लहान होतात तर दिवस मोठा होऊ लागतो. कृषीप्रधान भारतात याचे महत्त्व वेगळे सांगण्याची गरज नाही. या दृष्टीनेही हा सण आनंदाने साजरा केला जातो. देवदर्शन, एकमेकींना बोरं-उसाचे करवे-शेंगा-काही भाज्या यांचे वाण देणे, विस्तवावर दूध उतू घालवणे या आणि अशा पारंपरिक प्रथा आज फारशा दिसत नसल्या तरी घरोघरच्या स्त्रिया एकमेकींना हळद-कुंकू लावून तिळाचे लाडू वा वड्या अवश्य देतात. मुख्य म्हणजे रथसप्तमीपर्यंत हा आनंदोत्सव रंगत राहतो. स्नेहाचे प्रतीक म्हणून सगळेच एकमेकांना तिळगूळ देतात. ‌‘तिळगूळ घ्या आणि गोड बोला’ अशी प्रेमळ विनंती करतात. थोडक्यात,  हेवे-दावे विसरून नव्याने एकत्र येण्याचा आणि असलेले बंध दृढ करण्याचा हा दिवस… त्यामुळेच आजच्या संघर्षमय जीवनात अशा सणाचे महत्त्व जपणे अधिक समर्पक ठरते.

संक्रांत आणि पतंग यांचे नाते अतूट आहे. निरभ्र आकाशात, आल्हाददायक वातावरणात तासनतास पतंग उडवण्याची कल्पना तरी किती छान! थंडीच्या सरत्या दिवसात उन्हे अंगावर झेलत पतंग उडवायचा! नभात लाल, निळे, पिवळे, हिरवे लहान-मोठे पतंग आकाशात उडत असतात. कुणाचे पतंग झरझर वर चढतात तर कोणाचे आकाशात झेप घेता घेता झपकन खाली येतात. कुशल हातांनी आपल्या पतंगाला कधी ढील देत, कधी खेचत दिशा देता येते. कुणी दुसऱ्याचे पतंग कापतो आणि एकच ओरडा होतो. खरे म्हणजे आपल्या पतंगाची दोरी आपल्याच हातात असते. ज्याची दोरीवरची पकड जबरदस्त, तोच दुसऱ्याचे पतंग कापतो. एकाची जीत- दुसऱ्याची हार ! मग हे गरगरत खाली पडणारे पतंग पकडण्यासाठी कोण धावाधाव होते…

साऱ्या आयुष्याच्या खेळाचेच नाही का हे प्रतीक? प्रत्येकजण आयुष्यभर हा खेळ खेळत असतो. आशेचे, ध्येयाचे पतंग आयुष्यभर उडवत असतो. कुवतीनुसार त्याला दिशा देतो. प्रयत्नपूर्वक साध्य केलेल्या कुशलतेने हे जमवणाऱ्याचा पतंग आकाशात उंच उंच जातो आणि उंचीवर असा काही स्थिरावतो की जणू त्याला अढळपदच मिळालेय. बाकीचे इतस्ततः विखुरलेले… कुठे ना कुठे अडकलेले… काही तर फाटके-तुटके… हे टाळायचे तर मुळात सूत्रधाराची पकड व्यवस्थित हवी, कौशल्य कमावलेले हवे. वाऱ्याची योग्य दिशा मिळताच सरसरून पुढे जाणारे हात हवे. महत्त्वाचे म्हणजे खेळाच्या मैदानातून बाहेर येताच हार-जीत विसरणारे मन हवे. हा जीत, हा जेता असा भेदाभेद पुसून टाकणारा तरल भाव हवा.

आपण सारेच एका नावेचे प्रवासी आहोत. वल्हवणारा प्रवासी आपल्यातलाच वाटत असला तरी वाऱ्याची दिशा ठरवणारा… साऱ्या खेळाचा सूत्रधार? आपल्याहून वेगळा.. ज्याच्या त्याच्या मनातला.
या सणांच्या निमित्ताने माणसाच्या सामाजिक संपर्कप्रियतेचे आविष्कार पूर्वीपासून होत आले आहेत. स्त्री वर्गाने घरोघर योजलेले हळदीकुंकू समारंभ हा देखील सामाजिक अभिसरणाचाच एक प्रकार आहे.
हे कार्यक्रम समाजात रुढ झाले त्यामागेदेखील ही अभिसरणाचीच भावना अभिप्रेत नाही का? मानवजातीत झालेल्या थोर विचारवंतांनी विश्वकल्याणाची अनेक सूत्रे साध्यासुध्या धार्मिक, सामाजिक, कौटुंबिक व्यवहारातून सामान्य माणसांपर्यंत आणून पोचवली. आज शिक्षणाच्या प्रसाराबरोबर सर्व जुने-नवे विचार समजून घेण्याचा आवाका वाढला आहे. त्याचा डोळस उपयोग केला पाहिजे.

जग प्रकाशपूजक आहेे. वनस्पती अंधारात ठेवली तर प्रकाश मिळेल त्या झरोक्यातून उजेडाचा शोध घेत जाताना दिसते. जगाच्या चैतन्याचे मूळ प्रकाशातच आहे. प्रकाश आहे म्हणून दृष्टी आहे आणि दृष्टी आहे म्हणून सृष्टी आहे, हा तर आपला सर्वांचा अनुभव. सृष्टीच्या प्रत्येक घटकाला प्रकाशाची ओढ आहे. आपल्याला अंधार हवा असतो, पण तो तात्पुरताच, कायमचा नव्हे. आपण प्रकाशासाठी  आतुर असतो, त्याच्याअभावी बैचेन होतो. रात्र संपणार आणि दिवस उजाडणार या भरवशावर आपण निर्धास्त असतो. सृष्टीतल्या प्रकाशाचा मूळ स्त्रोत आहे सूर्य. सूर्य म्हणजे तेजोमूर्तीच. ‌‘सूर्य आत्मा जगतस्तस्थुषश्च !’ असे म्हटले आहे. म्हणजे चर आणि स्थिर अशा संपूर्ण सृष्टीचा आत्मा सूर्यच आहे. सृष्टीच्या सृजन-पालन-पोषणाची जबाबदारी तो नेमकेपणे सांभाळतो आहे, तोवर ठीक आहे. सूर्याचा अंतरिक्षातला प्रवास, सूर्याभोवती फिरणाऱ्या पृथ्वीसारख्या ग्रहगोलांचा प्रवास आणि आणि सूर्यापेक्षा कित्येक पटींनी मोठ्या असणाऱ्या असंख्य वाऱ्यांचा प्रवास यांची एक प्रचंड यंत्रणा अंतरिक्षात सुरू आहे आणि तिचे एक सर्वसमावेशक वेळापत्रक आहे. त्यातले अगदी थोडेसे वैज्ञानिकांना कळले आहे; किती तरी अजून कळायचे आहे. याचाच एक भाग म्हणून अलिकडेच माणसाने अंतरिक्षात पाठवलेली आणि विशिष्ट जागेवर स्थिर झालेली एक दुर्बीण आता सूर्याचा तसेच त्यापासून निघणाऱ्या तेजकिरणांचा अभ्यास करण्यात व्यस्त आहे.

सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो, त्या अवस्थेला संक्रमण म्हणतात. ज्या दिवशी किंवा नेमक्या ज्या वेळेला हे संक्रमण घडते त्याला आपण संक्रांती म्हणतो. म्हणजे दर महिन्यामध्ये एक संक्रांत येते. थोडक्यात, संक्रांत म्हणजे सूर्याचे राश्यंतर. सुदैवाने आपण दिनमान आणि रात्रीमान यामध्ये जास्त फरक नसणाऱ्या प्रदेशात रहातो. म्हणजे अगदी छोटासा दिवस आणि प्रदीर्घ रात्र असे आपल्याकडे कधीच घडत नाही. पण खूप उत्तरेला किंवा खूप दक्षिणेला जावे, तसा हा फरक वाढत जातो आणि शेवटी ध्रुव प्रदेशात तर सहा महिन्यांची रात्र आणि सहा महिन्यांचा दिवस अशी स्थिती होते. ती सहा महिन्यांची रात्र माणसाचा अंत पहात असेल तेव्हा तो दिवसाच्या दर्शनाला किती अधीर होत असेल याची कल्पना करुन पहा.

इतिहासशास्त्रज्ञ सांगतात की हजारो वर्षांपूर्वी आर्यलोक ध्रुवावर रहात होते. त्यांचा वर्षातला बराच काळ दिवसासाठी उत्कंठित झालेल्या अवस्थेत जात असे. हे खरे असेल तर दक्षिणेकडे गेलेला चैतन्यदाता सूर्य उत्तरेकडे यायला वळतो तो दिवस मोठा भाग्याचा समजून त्यांनी सण म्हणून साजरा केला असेल तर त्यात काहीच आश्चर्य नाही. एकंदरच संक्रांत हे प्रकाशपूजेचे सूत्र म्हणून लक्षात घेतले तर रुढींचा अर्थ उलगडतो, संकेतांमागची भावना कळते आणि आपण काय करायला हवे हे ही उमगते. उत्साहाची देवाणघेवाण हे तर सर्वच सण-समारंभाचे रहस्य आहे. ते विधीवत साजरे केल्यामुळे पुण्याबरोबर आनंदच मिळतो. तिळगूळ देऊन-घेऊन एकमेकांशी गोड बोलण्याने तो वृद्धिंगत होतो. चला तर, असाच आनंद घेऊ आणि देऊ या. संक्रांत आनंदाने साजरी करु या.


Related

Tags: alibageditorial articlemarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

रात्र थोडी सोंगे फार

Next Post

वरंडेचा सरपंच सुधीर चेरकरला अटक

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले
sliderhome

Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले

April 2, 2025
वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील
sliderhome

वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील

March 18, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
रायगड

जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ

March 8, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
रायगड

जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ

March 8, 2025
अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका
रायगड

अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका

March 8, 2025
भारताचे मिशन ‘मेडल्स’
sliderhome

भारताचे मिशन ‘मेडल्स’

July 22, 2024
Next Post

वरंडेचा सरपंच सुधीर चेरकरला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?