बाहेरगावाहून येणार्‍यांसाठी कोरोना चाचणी बंधनकारक करा

प्रितम म्हात्रे यांची मागणी
। पनवेल । प्रतिनिधी ।
राज्यात कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, पनवेल महानगरपालिकेने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, तसेच विदेशातून येणार्‍यांसाठी कोरोना चाचणी बंधनकारक करावी, अशी मागणी पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी केली आहे. ते पुढे म्हणाले की, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारी म्हणून पनवेल महानगरपालिकेने योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.

तसेच जनजागृती करून नागरिकांनी खबरदारी घ्यावी यासाठी विशेष मोहीम राबवावी जेणेकरून भविष्यात रुग्णांची संख्या वाढणार नाही. कोरोनानंतर पूर्वपदावर आलेले जनजीवन विस्कळीत होणार नाही, यासाठी योग्य प्रकार नियोजन करावे, अशी सूचनादेखील त्यांनी प्रशासनाला केली आहे.

विदेशातून येणार्‍या नागरिकांची नोंद घेऊन त्यांची कोविड चाचणी करणे बंधनकारक करावे जेणेकरून जर ती व्यक्ती पॉझिटिव्ह निघाली, तर त्याला त्वरित क्वारंटाईन करता येईल, जेणेकरून त्या एका रुग्णामुळे भविष्यात अख्ख्या सोसायटीला त्रास होऊ नये.

– प्रीतम म्हात्रे, माजी विरोधी पक्षनेते
Exit mobile version