दर्जेदार रस्ता बनवा अन्यथा उपोषण: अरविंद गायकर

| आगरदांडा | प्रतिनिधी |

साळाव-मुरुड-आगरदांडा रस्ता चांगल्या दर्जाचा बनवावा, अशी मागणी अरविंद गायकर यांनी केली आहे. जर चांगल्या दर्जाचा काम झालं नाही, तर रस्त्यातच उपोषणाला बसणार, असा इशारा गायकर यांनी दिला आहे.

मुरुड पर्यटन क्षेत्र असून, याच रस्त्यावरून रोज शेकडोंच्या संख्येने येणारे पर्यटक रस्त्यामुळे पाठ फिरवत आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मुरुड शहरातील टपरीधारक हॉटेल, लॉजिंग व रेस्टॉरंट यांना आर्थिक फटका बसून काही जण कर्जबाजारी झाले. याला सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम विभाग व येथील निकृष्ट दर्जाचा रस्ता जबाबदार आहे, असा आरोप गायकर यांनी केला आहे.

गेले पंधरा वर्षांपासून या रस्त्याच्या खड्ड्यातून अनेक अपघात व गाड्यांचे नुकसान नागरिक सहन करत आले आहेत. तसेच अलिबागवरुन स्पेशालिस्ट डॉक्टर यायचे बंद झाले. त्यामुळे या खड्ड्यांतून रुग्णांना अलिबागला जावे लागत आहेत. आता या रस्त्याला राज्य सरकारने चांगला निधी उपलब्ध करून दिला असून, ज्या ठेकेदाराला काम मिळालं, त्याने चांगल्या दर्जाचा रस्ता बनवावा, यामध्ये हलगर्जीपणा करु नये, असा इशारा अरविंद गायकर यांनी दिला आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी पुढे येऊन रस्त्याच्या कामाकडे बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे. तरच हा चांगला रस्ता चांगला बनेल आणि टिकेल, तरी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहनही अरविंद गायकर यांनी केले आहे.

Exit mobile version