मायक्रोसॉफ्ट सुरक्षा प्रणालीमध्ये बिघाड, विमानसेवा ठप्प

प्रवाशांचे मोठे हाल; विमानसेवा, बँका, शेअर मार्केट ठप्प

| मुंबई | प्रतिनिधी |

2024 मधील सर्वात मोठं संकट पहिल्यांदाच आले आहे. मायक्रोसॉफ्ट सुरक्षा प्रणालीमध्ये बिघाड यंत्रणेत मोठा बिघाड झाला आहे. यामुळे बँका, विमानतळावरील सर्व यंत्रणा ठप्प झाल्या आहेत. जिथे जिथे मायक्रोसॉफ्टचा वापर होतो अशा सर्व संस्थांमध्ये अडचणी येत असल्याने तिथली यंत्रणा ठप्प झाली आहे. मायक्रोसॉफ्टचा सर्व्हर डाऊन झाल्याने मोठा परिणाम झाला आहे.

विमानतळावरील सर्व्हर डाऊन झाला आहे. जगभरातील बँक सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. याचा परिणाम शेअर मार्केटवरही झाला आहे. आंतरराष्ट्रीय आणि देशातील शेअर्स देखील दुसऱ्या सत्रात कोसळल्याचे दिसले. त्यामुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. जगभरातील मोठी विमानतळं ठप्प झाली आहेत. जगभरातील अनेक विमानतळांवर वेब चेक-इन करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे मुंबई, बंगळुरू, दिल्लीसह देशातील अनेक विमानतळांवर प्रवासी ताटकळत थांबले आहेत. आकाश वायु ने प्रवाशांना सांगितले आहे की ते विमानतळांवर मॅन्युअल चेक-इन आणि बोर्डिंग सुविधा देत आहेत. इंडिगो, आकासा एअर आणि स्पाइसजेटने चेक-इनसाठी वापरलेल्या सॉफ्टवेअरमध्ये अडचण आली आहे. या तिन्ही एअरलाईन्स GoNow चेक-इन सिस्टम वापरतात, ज्याने सकाळी 10.45 वाजता जगभरात तांत्रिक अडचणींचा सामना करण्यास सुरुवात केली. एअरलाइन्स मायक्रोसॉफ्टसोबत सकाळी 10 वाजल्यापासून काम करत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

Exit mobile version