सरकारी पाहुणे येण्याची मलिकांना शंका

मुंबई | प्रतिनिधी |
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एक ट्विट केल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत. सुना है, मेरे घर आज-कल मे सरकारी मेहमान आने वाले है, असं नवाब मलिक यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे मलिक यांच्या घरावर तपास यंत्रणांची धाड पडणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र, मलिक यांनी अधिक भाष्य न करता फक्त सूचक विधान केलं आहे.
घाबरणं रोज मेल्यासारखं आहे. आपल्याला घाबरायचं नाही तर लढायचं आहे. गांधीजी गोर्‍यांसोबत लढले होते. आपल्याला चोरांसोबत लढायचं आहे, असं मलिक यांना म्हणायचं आहे. पण त्यांनी सरकारी पाहुणे कोणत्या यंत्रणेचे येणार हे काही स्पष्ट केलं नाही. त्यामुळे मलिक यांच्या या ट्विटवर तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Exit mobile version