माल्ल्या, नीरव मोदी, चोक्सीची संपत्ती जप्त

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत विजय माल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्याशी संबंधित प्रकरणांमध्ये आतापर्यंत 19111.20 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. या तिघांनी कर्ज बुडवल्याने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा एकूण 22585.83 कोटी रुपयांचा तोटा झाला असल्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले. 15 मार्च 2022 पर्यंत ‘पीएमएलए’च्या तरतुदींतर्गत 19111.20 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. त्यापैकी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना 15113.91 कोटी रुपयांच्या मालमत्तेची परतफेड करण्यात आली आहे. या प्रकरणांमध्ये केंद्र सरकारने 335.06 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

Exit mobile version