MPSC परीक्षेदरम्यान गैरप्रकार

। पुणे | वृत्तसंस्था |

शासकीय परीक्षांदरम्यान होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाकडून अनेक प्रकारे दक्षता घेतली जाते. उमेदवारांनी अशा परीक्षांमध्ये कॉपी करणं हा गंभीर प्रकार मानला जात असून अशा उमेदवारांवर कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते.

महाराष्ट्र गट ‘क’ सेवा मुख्य परीक्षा 2021 संयुक्त पेपर 1 ची परीक्षा आज पार पडली. दरम्यान, परीक्षेच्या विविध उपकेंद्रांच्या ठिकाणी आयोगाच्या दक्षता पथकाने संशयित उमेदवारांची तपासणी केली. यामध्ये पुणे जिल्ह्याच्या नऱ्हे येथील उपकेंद्रावर केवलसिंग चैनसिंग गुसींगे या उमेदवाराकडे गैरप्रकाराच्या उद्देशाने लपवलेले मोबाईल फोन व ब्लूटूथ इयर फोन इत्यादी साहित्य सापडले. या उमेदवारावर आयोगाच्या कार्यालयाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

Exit mobile version