लेखी परिक्षेतील गैरप्रकार

आरोपींना 17 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी; मास्टर माईंड छत्रपती संभाजीनगरमधून हलवत होता सूत्र

| रायगड | खास प्रतिनिधी |

पोलीस शिपाई, चालक आणि बँड्समन पदाच्या लेखी परिक्षेत गैरप्रकार झाला होता. याप्रकरणी सहा उमेदवारांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना न्यायालयाने 17 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यातील मास्टर माईंड हा छत्रपती संभाजीनगरमधून सूत्रे हलवीत असल्याचे तपासात समोर आले आहे. रामदास ढवळे, दत्ता ढेंबरे, ईश्‍वर जाधव, गोरख गडदे, सागर जोनवाल आणि शुभम कोरडे अशी आरोपींची नावे आहेत.

शनिवारी 10 ऑगस्ट रोजी अलिबाग आणि पेण तालुक्यातील केंद्रावर सदरची लेखी परिक्षा पार पडली होती. त्यावेळी एका उमेदवाराबाबत शंका आल्याने त्याची झडती घेतली असता. त्याने एकावर एक चार अंडरवेअर घातल्या होत्या आणि अंडरवेअरच्या आतमध्ये चायना कंपनीचा अतिशय चपटा मोबाईल तपवल्याचे दिसून आले. अधिक झडती घेतली असता. त्याच्या कानामध्ये एक छोटा इलेक्ट्रॉन्कीस डिवाईस आढळला. त्यानंतर प्रत्येक उमेदावाराची तपासणी करण्यात आली असता. सहा उमेदवारांकडे मोबाईलसह इलेक्ट्रॉन्कीस डिवाईस सापडले. एका उमेदवाराच्या कानातून डिवाईस काढताना जिल्हा रुग्णालयात नेऊन शस्त्रक्रीया करुन ते कानाच्या आतून काढण्यात आले. त्यांच्याकडे असणारा मोबाईल हा फक्त इनकमींग कॉल्स घेऊ शकत होता. समोरील व्यक्ती त्यांना प्रश्‍नपत्रिकेतील उत्तरे सांगणार असल्याचे समोर आले आहे.

सदरची लेखी परिक्षा राज्यातील अन्य 40 ठिकाणी पार पडली होती, मात्र रायगड पोलिसांनी मोठ्या शिताफीने गैरप्रकार करणार्‍यांचा पर्दाफाश केला आहे. अन्य ठिकाणी असे प्रकार झाले नसल्याची खात्री देता येत नाही. त्यामुळे पोलीस तपासामध्ये अन्य काही जण पोलीसांच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Exit mobile version