ममता – सोनिया भेटीत नवीन समीकरणे

2024 च्याा लोकसभेसाठी जुळवाजुळव

नवी दिल्ली | वृत्तंसस्था |
पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. 10 जनपथ मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी जवळपास तासभर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधीही तेथे उपस्थित होते. पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर ममता बॅनर्जी यांचा पहिला दिल्ली दौरा आहे. या दौर्‍यात त्यांनी अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. दरम्यान मंगळवारी ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. बैठकीनंतर सौजन्य भेट असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
सोनिया गांधी यांनाही विरोधकांची एकजूट व्हावी असं वाटत आहे. काँग्रेसचा प्रादेशिक पक्षांवर विश्‍वास आहे आणि प्रादेशिक पक्षांचा काँग्रेसवर विश्‍वास आहे. जे लोक सरकारचा विरोध करताहेत त्यांच्याकडे काळा पैसा असल्याचं भासवलं जात आहे.नरेंद्र मोदी 2019 ला लोकप्रिय होते. त्यांनी करोना मृतांची आकडेवारी ठेवली नाही. अंत्यसंस्कार केले नाहीत आणि मृतदेह गंगा नदीत फेकून दिले. ज्यांनी आपल्या लोकांना गमवलं आहे असं लोक त्यांना माफ करणार नाहीत. , असं पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बैठकीनंतर सांगितलं.
ममता बॅनर्जी यांच्या दिल्ली दौर्‍यातून भाजपा विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न आहे, असंही बोललं जात आहे. तृणमूल काँग्रेसच्या मुखपत्रातही ङ्गएबार शपथ, चलो दिल्लीफ याबाबतची घोषणा देण्यात आली आहे. त्यामुळे हा दौरा आणि घोषणेकडे एका नजरेतून बघितलं जात आहे.

Exit mobile version