प्रवाशाला मारहाण करून लुटणारे जेरबंद

। पनवेल । वार्ताहर ।

प्रवाशाला मारहाण करून लुटणाऱ्या रिक्षा चालकासह त्याचे इतर साथीदारांना पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा हस्तगत केली आहे. अजिवली येथील तक्रारदार पंकज सिंग (45) हा आरोपी आकाश चव्हाण (22 ) याच्या रिक्षातून जात असताना त्यांची रिक्षा तक्का सिग्नलजवळ आली असता आकाश चव्हाण याने पंकज सिंग याला सांगितले की, मला दुसरे भाडे आहे. तरी तुम्ही इथेच उतरा व दुसरी रिक्षा पकडून जा असे सांगितल्याने पंकज सिंग याने त्याला भाडे देण्यासाठी पाकीट काढले असता आरोपी आकाश चव्हाण व रिक्षात असलेले त्याचे सहकारी पांडव (35 ), समीर बागवान (21), शुभम आढाव (23 ) यांनी त्याच्या पाकिटातील असलेली रोख रक्कम जबरीने चोरून व त्याला हाताबुक्यांनी मारहाण करून रिक्षा घेऊन ते पसार झाले होते. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद लभडे, पो. हवा मिथुन भोसले, पो.हवा तुषार बोरसे आदींच्या पथकाने तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराच्या आधारे या चौकडीला गुन्ह्यातील रिक्षासह ताब्यात घेतले आहे.

Exit mobile version