| पेण | प्रतिनिधी |
पीडित चार वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्या प्रेम भोकरे नामक अल्पवयीन तरूणाला पेण पोलिसांनी अटक केली आहे. यातील पीडित बालिका व आरोपी यांच्यामध्ये मामा- भाचीचे नाते असून, बालिका ही अल्पवयीन असल्याचे माहित असून देखील आरोपीकडून अशोभनिय कृत्य झाल्याने पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी प्रेम भोकरे अल्पवयीन असल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कर्जत येथील बाल सुधारगृहात त्याची रवानगी केली आहे. पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली उप पोलीस निरीक्षक शिल्पा वेंगुर्लेकर या गुन्ह्यातील अधिक तपास करीत आहेत.






