। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल रेल्वे स्टेशन येथील नवीन बुकिंग ब्रिजवरून पडून एका अंदाजे 35 वर्षीय अज्ञात इसमाचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद पनवेल लोहमार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली असून मृताची ओळख पटविण्यासाठी पोलिस मृताच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत.
हा इसम पनवेल रेल्व स्थानक नवीन ब्रिजवरून पडल्याने जबर जखमी होऊन बेशुद्ध अवस्थेत पोलिसांना दिसून आला होता. यावेळी पनवेल रेल्वे पोलिसांनी त्यास उपचारसाठी उप जिल्हा रुग्णालय पनवेल येथे दाखल केले असता, तेथील डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. अंगाने मध्यम बांधा असलेल्या या मृत इसमाची उंची 5 फुट 5 इंच इतकी असून त्याने अंगात पिवळ्या रंगाचा हाफ बाह्यांचा टी शर्ट, आत हिरव्या रंगाचे बनियन व नेसणीस निळ्या रंगाची फुल जीन्स पॅन्ट परिधान केली आहे. मृताच्या डाव्या हाताच्या मनगटावर सुधीर व चार स्टारचे ओळख चिन्ह गोंदलेले आहे. या वर्णनाच्या इसमाच्या वारसाचा शोध लागल्यास पनवेल रेल्वे पोलीस ठाणे येथे पोलीस उपनिरीक्षक ए.पी.गोपाळे व पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण वेदपाठक (9870157850) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.





