। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील रामनाथ येथे गावदेव क्रिकेट संघ आणि सन्मित्र मंडळ रामनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. 10 एप्रिल रोजी डे नाईट सर्कल अंडरआर्म टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील अंतिम सामना गौरी स्पोर्ट्स, अलिबाग विरुद्ध महाडिक वाडी, पेण या संघात झाला. गौरी स्पोर्ट्स, अलिबाग संघाने बाजी मारीत गावदेवी चषक पटकाविला.
तत्पूर्वी, स्पर्धेचे उद्घाटन नंदकुमार जोशी व राकेश चौलकर यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले. दरम्यान, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्यासह सोहम वैद्य आदी मान्यवरांनी स्पर्धेला सदिच्छा भेट देऊन आयोजकांसह खेळाडूंना प्रोत्साहित केले. या स्पर्धेचे समालोचन मुकेश भोईर, यश मापगावकर यांनी केले. तर, स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सौरभ पालवणकर, रितेश गुरव, विराज चौलकर, कपील पालवणकर, जय राठोड यांनी मेहनत घेतली.