। मुंबई । वृत्तसंस्था ।
मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांना धमकी देणाऱ्याला बिहारमध्ये अटक करण्यात आले आहे.
बुधवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास रिलायन्स फाउंडेशनच्या सर एचएन हॉस्पिटलच्या लॅंडलाईनवर एक अज्ञात नंबरवरुन कॉल आला होता. हे हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याची धमकी या कॉलच्या माध्यमातून देण्यात आली. तसेच मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनाही जीवे मारण्याची धमकी यावेळी देण्यात आली होती.
मुकेश अंबानी धमकी प्रकरणी आरोपीला बिहारच्या ब्रह्मपुरा गावात राहणाऱ्या राकेश कुमारला बुधवारी संध्याकाळी अटक करण्यात आली आहे. बुधवारी संध्याकाळी 4 च्या दरम्यान साध्या वेशात पोलिस राकेशच्या घरी पोहचली. पहिल्यांदा पोलिसांनी राकेशच्या मोबाईलवर कॉल केला. त्यानंतर राकेशने कॉल रिसिव्ह केला. राकेशच्या मोबाईलचे लोकेशन कन्फर्म झाल्यानंतर पोलिसांनी राकेशला अटक केली.
तसेच आरोपीवर आयपीएसच्या कलम 506(2),507 अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. आरोपी बेरोजगार असून त्याने धमकी का दिली?याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मुंबई पोलिसांनी त्याला पुढील तपासासाठी मुंबईत आणले आहे.
मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकीचा फोन हा पहिल्यांदा आला नसून या अगोदर देखील त्यांना धमकी देण्यात आली होती.