मनस्विनी पाटील सेवानिवृत्त

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"border":1,"transform":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

| पेझारी | वार्ताहर |

पोयनाड येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या ना. ना. पाटील हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका मनस्विनी अजितकुमार पाटील या चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेनंतर दि. 31 जुलै रोजी सेवानिवृत्त झाल्या. त्यांचा सेवापुर्ती सन्मान सोहळा आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी असा दुहेरी कार्यक्रम ना.ना. पाटील संकुलाच्या सुलभा काकू सभागृहामध्ये संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात राजेंद्र म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कलापथकाने सादर केलेल्या इशस्तवन आणि स्वागत गीताने झाली. प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन सायली पाटील यांनी केले. त्यांच्या कुटुंबीयांतर्फे रुचिता पाटील, पंकज पाटील, केंद्रप्रमुख वि.का.पाटील, राजेंद्र मोकल, मनोज पाटील यांनी मनोगते व्यक्त केले. यानंतर मनस्विनी पाटील यांचा त्यांचे पती अजितकुमार बाळाराम पाटील यांच्यासह सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी देवेंद्र पाटील, तृप्ती पिळवणकर, समीर भोईर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version