‘लम्पी’ला रोखण्यासाठी मांदाटणे ग्रामपंचायत सज्ज

ग्रामपंचायतीकडून 100 टक्के लसीकरण पूर्ण

| म्हसळा | वार्ताहर |

म्हसळा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मांदाटणे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील जनावरांचे लम्पी रोगापासून संरक्षण व्हावे, याकरिता लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व पशुपालकांनी या मोहिमेत सहभागी होत आपल्या जनावरांचे लसीकरण करुन घेतले.

मांदाटणे सरपंच चंद्रकांत पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री पशु स्वास्थ्य योजना पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती म्हसळा पशुधन विकास अधिकारी (वि) डॉ. किशोर सरगर, म्हसळा तहसील खामगाव मंडळ अधिकारी सलीम शहा, मुख्यमंत्री पशु स्वास्थ्य योजना श्रीवर्धन डॉ. ए.ए. कांबळे, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय डॉ. प्रशांत सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत मांदाटणे पंचक्रोशीतील लम्पी आजाराने ग्रस्त पशु यांचे संरक्षण करण्यासाठी व कोणत्याही प्रकारचे लम्पी रोगाची लागण होऊ नये म्हणून सर्व गुरांना लसीकरण करण्यात आले. तसेच या आजाराबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य भिकू डोंगरे, धनश्री मुंडे, सहाय्यक प.वि. अधिकारी डॉ. व्ही.ए. म्हापणकर, संदेरी पी.डी. बुलबुले, खामगाव डॉ. व्ही.जी. राठोड, पशुसंवर्धन विभाग सुनील कांबळे, प्रभाकर मोरे, महादेव नाक्ती, स्वदेश फाऊंडेशनचे अरुण कोल्हे, केतन चव्हाण, ग्रामसेवक पी.बी. ठाकरे उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच चंद्रकांत पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Exit mobile version