| अलिबाग | प्रतिनिधी |
दादासाहेब गणपतराव शिंगाडे यांचे गुरुवारी (दि.24) अल्पशा आजारामुळे निधन झाले. शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांचे खासगी स्वीय सहाय्यक मंदार शिंगाडे यांचे ते वडील होत. दादासाहेब शिंगाडे हे आदर्श शिक्षक होते. फुरसुंगी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये गेल्या अनेक वर्षे सेवा केली होती. शैक्षणिक क्षेत्रात काम करीत असताना सामाजिक क्षेत्रातही त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. गुरुवारी (दि.24) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजारामुळे त्यांचे राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे शिंगाडे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.
मंदार शिंगाडे यांना पितृशोक
