मांडवखारचे कबड्डीतील पदार्पण गावासाठी लाभदायक

| खारेपाट | वार्ताहर |

अलिबाग तालुक्यातील मांडवखार गावातील तरुण मुलांनी मागील 4 ते 5 वर्षापासून कबड्डी खेळ सुरु केला . हे गावासाठी नक्कीच लाभदायक ठरेल असा विश्वास क्रीडा संघटकव ऑल इंडिया पॅसेंजर्स असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी केले. जय हनुमान मांडवखार यांच्यावतीने तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रीय कबड्डीपटू विजय म्हात्रे, पांडुरंग बोरकर, स्व. भगवान म्हात्रे, स्व. भास्कर म्हात्रे माटुंगा येथील रेल्वेच्या व्यायामशाळेत स्वत:सराव करायचे व नवोदित खेळाडूंनादेखील ही सेवा उपलब्ध करुन द्यायचे तरुण खेळाडूंना आवश्यकते सहकार्य करण्यात येईल असे सांगितले. यावेळी चिंचवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजाराम गावंड यांनी देखील उपस्थित संघाना शुभेच्छा देवून स्पर्धेसाठी अनेक मान्यवरांकडून आर्थिक सहकार्य केले.

स्पर्धेस रमेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य नरेश पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य विवेक मोकल, पल्लवी म्हात्रे आदि.प्रमुख मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेत अंतिम विजेता संघ बहिरेश्वर ठरला त्यांने श्री गणेश थळ संघाचा पराभव केला. तृतीय क्रमांक जय हनुमान कातळपाडा व चतुर्थ क्रमांक जय हनुमान सहानगोठी संघाने पटकाविला. स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू अजिंक्य पाटील, उत्कृष्ट चढाई भावेश भगत थळ, उत्कृष्ट पकड सौरभ तुणतुणे सहानगोठी, पब्लिक हिरो जितेश पडवळ कातळपाडा यांना गौरविण्यात आले. जय हनुमान मांडवखार संघाचे पदाधिकारी तेजस पाटील व त्यांचे सहकारी यांनी स्पर्धेची चोख व्यवस्था ठेवली होती.

Exit mobile version