शुटींगबॉल स्पर्धेत मांडवखार संघाची बाजी

। खारेपाट । वार्ताहर ।
खारेपाटातील मॉडेल संघ रांजणखार आयोजित मंडळाचे अध्यक्ष स्व.ज्ञानेश्‍वर म्हात्रे यांच्या स्मरणार्थ शुटींग बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या उद्घाटना प्रसंगी माजी उपसरपंच अशोक नाईक, मंडळाचे उपाध्यक्ष रमाकांत पाटील, सचिव विनायक पाटील, संयोजक मधुकर म्हात्रे, चंदु म्हात्रे, दत्तात्रेय पाटील, आप्पा म्हात्रे मुंबई व मंडळाचे सर्व पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमाकांचा मानकरी विद्युत मांडवखार संघ विजेता ठरला. तर उपविजेता ए वन संघ मानकुळे व तृतीय क्रमाक मॉडेल संघ रांजणखार, चतुर्थ क्रमांक मॉर्डन स्टार रांजणखार हे संघ विजेते ठरले. तसेच स्पर्धेत उत्कृष्ट शूटर राजेश पाटील मॉडेल विद्युत मांडवखार, उत्कृष्ट डिफेंडर रत्नेश मोकल विद्युत मांडवखार, उत्कृष्ट खेळाडू रोहित पाटील ए वन माणकुळे, उत्कृष्ट पंचर वैभव मोकल विद्युत मांडवखार या खेळांडूनी उत्कृष्ट खेळी केली.
खारेपाटातील मॉडेल संघ रांजणखार सलग 63 व्या वर्षात पदार्पण केले असून संपूर्ण रायगड जिल्ह्यात सातत्याने स्पर्धा भरवूण एक आदर्श निर्माण केला आहे. सदर स्पर्धेत 16 नामांकित संघ सामील झाले होते.

Exit mobile version