| कर्जत | प्रतिनिधी |
सामसूम रस्त्याचा फायदा उठवत रात्रीच्यावेळी नातीला फिरायला घेऊन गेलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र व सोन्याची चेन अज्ञात चोरट्याने मोटारसायकल वरुन येऊन चोरून नेल्याची घटना कर्जत शहरात घडली. कर्जत नगरपालिका क्षेत्रातील विठ्ठल नगर परिसरात माऊली को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीमध्ये राहणारी महिला आपल्या पतीसह दहा-साडेदहाच्या सुमारास आपल्या नातीला फिरायला घेऊन गेले होते. पती नातीला घेऊन पुढे चालत होते व महिला मागून चालली होती. सामसूम रस्त्याचा फायदा उठवत मोटरसायकलवर आलेल्या अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व सोन्याची चेन मागच्या बाजूने खेचून पलायन केले. विठ्ठलनगर परिसरातील भाऊसाहेब राऊत चौक ते अभिनव ज्ञान मंदिरकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही घटना घडल्याने नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे.