माणगाव इंदापूर बायपासचे काम रखडले

| माणगाव । वार्ताहर ।

कोकणासह तळ कोकणच्या विकासाचा मार्ग म्हणून ओळखला जाणारा मुंबई-गोवा महामार्गाची दिवसेंदिवस अवस्था पाहवेना झाली आहे. या मार्गावरून दिवसेंदिवस महाराष्ट्रासह अन्य राज्यातूनही पर्यटक मोठया प्रमाणात येतात, तसेच या मार्गाने प्रवासीही मोठया संख्येने प्रवास करत आहेत. या मार्गाच्या कामाची गेली दहा वर्षापासून रखडपट्टी सुरु आहे. त्यामुळे माणगाव व इंदापूर शहरात वाहतूक कोंडी होत आहे. तळ कोकणासह गोव्याकडे जाणार्‍या नागरिकांना माणगाव बाजारपेठेत अडथळा होऊ नये म्हणून माणगावच्या बाहेरून शहराला बायपास रस्ता काढला असून या बायपास मार्गाचे काम सहा वर्षापासून थांबले आहे. हा बायपास रस्ता वनखात्याच्या जमिनीतून व कोकण रेल्वेला उड्डाण पूल होत असल्याने इंदापूर आणि माणगाव येथील दोन्ही शहरालगतचे बायपासचे काम रखडले जात आहे.

त्यातच वैयक्तिक मालकी जमीनीच्या कांही मालकाना भूसंपादनाचा मोबदला मिळाला नसल्यामुळे बायपासचे काम रखडले आहे. केंद्रीय रस्ते, वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी 3 एप्रिल रोजी इंदापूर येथील कार्यक्रमात मुंबई-गोवा महामार्गाच्या रस्त्याचे काम एक वर्षात पूर्ण करू अशी ग्वाही दिली होती. मात्र वन, रेल्वे खात्याची मंजुरी मिळाली नसल्याने हे काम रखडले असून बायपासच्या कामाचा तिढा कायम राहिला आहे.

Exit mobile version