। माणगाव । प्रतिनिधी ।
गावातील एकोपा कायम अबाधित राहावा या उद्देशने जुने माणगाव येथील तरुणांनी 4 वर्षांपूर्वी एकत्रित येऊन जुने माणगाव प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेला सुरुवात केली होती. या वर्षीदेखील रविवारी (दि.4) माणगाव प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन येथील तीन बत्ती मैदानात करण्यात आले आहे. या स्पर्धेचा ग्रामस्थांनी तसेच क्रिकेट शौकिनांनी आवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
या स्पर्धेतील प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांकाच्या विजेत्यांसह उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, सामनावीर व सर्वोत्कृष्ट खेळाडू यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेची जोरदार तयारी आयोजकांतर्फे करण्यात आली आहे. या स्पर्धा यशस्वीरीत्या व उत्साहात पार पाडण्यासाठी जुने माणगाव प्रीमिअर लीगचे अध्यक्ष सुहेब परदेशी, उपाध्यक्ष रिहान मुल्ला, सचिव नदीम परदेशी, प्रतीक सोनार, सहसचिव फहद करबेलकर, मोहसीन नदाफ, खजिनदार सुमित पारखे, शैलेश भोईर, नागेश रातवडकर, सल्लागार दिलीप मोरे, आदिल गजगे, सहसल्लागार ताबिश जामदार, शहानवाज अत्तार व सहकारी विशेष परिश्रम घेत आहेत.







