माणगाव तालुक्यात ‘पुढच्या वर्षी लवकर या’ चा जयघोष

माणगाव | प्रतिनिधी |
गणपती बाप्पा मोरया … पुढच्या वर्षी लवकर या.. गणपती गेले गावाला … चैन पडेना आम्हाला गजरात माणगाव तालुक्यात पाच दिवसाच्या गणरायाला दि.14 सप्टेंबर रोजी भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावर्षीही माणगाव तालुक्यात अनेक गणेशभक्तांनी वाजत, गाजत,नाचत गणरायाची विसर्जन मिरवणूक काढली.तर काही गणेशभक्तांनी गेली दोन वर्षे साधेपणात गणेशोत्सव साजरा केला.काही अनेक गणेश भक्तांनी वाहनातून गणराय नेवून विसर्जन करून आपल्या लाडक्या गणराय बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला.यावेळी चोख पोलीस बंदोबस्त सर्वत्र ठेवण्यात आला होता.

Exit mobile version