माणगावः टीएमसीमध्ये विविध उपक्रम

| माणगाव | प्रतिनिधी |

जे.बी. सावंत एज्युकेशन सोसायटीचे, टिकमभाई मेथा कॉमर्स कॉलेज माणगाव येथे ‘मेरी माटी मेरा देश’ अभियान अंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये स्वच्छता अभियान, उणेगाव या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम, पंचप्रण शपथ, महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान, आंतरराष्ट्रीय युवा दिन, एचआयव्ही एड्स मार्गदर्शन आणि चाचणी तसेच हिमोग्लोबिन, थायरॉईड टेस्टिंग आणि ब्लड सेल्स काउंटिंग याप्रमाणे तपासणी असे विविध उपक्रम राबवण्यात आले. महाविद्यालयात ‘मतदार जनजागृती’ व ‘वीरों को नमन’ अभियान अंतर्गत वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आणि पोस्टर मेकिंग स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उस्फूर्तपणे आपला सहभाग नोंदविला.

वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सानिका शेडगे टी.वाय.बी.कॉम, द्वितीय क्रमांक दिपाली दिवेकर एस.वाय.बी.कॉम यांना प्राप्त झाला. रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक साक्षी माटल टी.वाय.बी.कॉम आणि महेक अंबुर्ले एस.वाय.बी.कॉम तर द्वितीय क्रमांक पूजा पवार एफ.वाय.बी.कॉम आणि उर्मिला जाधव एस.वाय.बी.कॉम यांना प्राप्त झाला. पोस्टर मेकिंग स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक नीतीशा अधिकारी एस.वाय.बी.कॉम व द्वितीय क्रमांक वैभव माळी एफ.वाय.बी.कॉम यांना प्राप्त झाला.

पल्लवी चव्हाण, प्रतीक दांडेकर गायत्री वाढवळ या विद्यार्थ्यांनी देखील वकृत्व स्पर्धेमध्ये आपला उत्तम सहभाग नोंदविला. अनुज कासारे, सेजल प्रजापति, रीया नाडकर, साक्षी विचारे, नितीशा अधिकारी, सलोनी अधिकारी, मयुरी अधिकारी, निर्जला नाडकर याप्रमाणे विद्यार्थ्यांनी रांगोळी स्पर्धेमध्ये सहभागी होऊन छान प्रतिसाद नोंदवला. महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य रामदास पुराणीक साहेब यांनी रांगोळी स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांकरिता रुपये 501/- इतके बक्षीस रोख स्वरूपात दिले व विद्यार्थ्यांचे त्यांच्या उत्कृष्ट सहभागाबद्दल कौतुक केले. वीरो को नमन आणि मतदार जनजागृती या थिमवर आधारित पोस्टर मेकिंग स्पर्धेमध्ये रसिका पवार, तनवी तळकर, तनवी देवघरकर या विद्यार्थिनींचा सहभाग देखील उत्तम राहिला. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी स्वयंसेवक शिवकुमार सिंग, प्रतीक दांडेकर, सानिका शेडगे, सिद्धेश धाडवे, नीतीशा अधिकारी, सलोनी अधिकारी, रोहन वाढवळ, प्रफुल्ल तेटगुरे, पार्थ दोशी, दीपेश कुळे, साक्षी माटल, वैभव माळी या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. सेक्रेटरी नानासाहेब सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.

Exit mobile version