आंबेडकर भावनासाठी माणगाव शासकीय जमीनच्या प्रतीक्षेत

पंकज तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
। माणगाव । वार्ताहर ।
माणगाव येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा भवन उभारणीसाठी शासकीय जमीन मिळावी यासाठी रायगड जिल्हाधिकारी अलिबाग यांना जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे गुरुवार सकाळी बौद्ध धम्म सामाजिक संस्थेचे माणगावचे संस्थापक अध्यक्ष पंकज रवींद्र तांबे व उपाध्यक्ष स्वप्नील शिर्के, सरचिटणीस संभाजी गायकवाड यांच्या यांनी निवेदन दिले. हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी रायगड अलिबाग डॉ.पदमश्री एस.बैनोडे यांनी स्वीकारले.
सदर निवेदनात असे म्हटले आहे कि, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती नुकतीच साजरी करण्यात आली. डॉ.आंबेडकर या थोर पुरुषांचे विचार समाजात तळागाळात पोहचविण्यासाठी तसेच आमचे माणगाव आणि त्या विभागातील तमाम बौद्ध बांधवांसह बहुजन समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी त्यांचे प्रबोधन विविध सामाजिक उपक्रम, शिबिरे, शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक विचार रुजविण्यासाठी सर्व सोयींनीयुक्त अशा प्रशस्त जागेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा भवन उभा करण्याचा माणगाव विभाग बौद्ध बांधवांच्या वतीने व बौद्ध धम्म सामाजिक संस्था माणगाव रायगड यांच्यावतीने आमचा मानस आहे. माणगाव हे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे.याठिकाणी या तालुक्यात बौद्ध समाज मोठ्या प्रमाणात आहे. या महामानवाच्या कार्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.या तालुक्यातील तमाम नागरिकांना माणगाव येथे भवन उभारण्याची इच्छा आहे. यासाठी आपण आम्हाला शासकीय जमीन उपलब्ध करून द्यावी अशी आमची आग्रहाची विनंती असून आमच्या मागणीचा विचार करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन उभारण्यासाठी आम्हाला शासकीय जागा मिळावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

Exit mobile version