माणगाव कुणबी भवन इमारतीसाठी निधी देणार

खा.तटकरे यांचे आश्‍वासन
| माणगाव | प्रतिनिधी |
कुणबी भवन हि माणगाव तालुक्याची शान व मान आहे.या कुणबी भवनामुळे तालुक्याच्या वैभवात भर पडली आहे. इमारत दुरुस्तीचे काम करायचे आहे. त्यासाठी लवकरच 25 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देईन असे अभिवचन े खा.सुनील तटकरे यांनी माणगाव येथे बोलताना दिले.

माणगाव तालुका कुणबी समाज विकास मंडळाच्या 21 व्या वर्धापन दिनानिमित्त श्री सत्यनारायणाची महापूजा, समाज बांधवांचा सामाजिक मेळावा व तटकरे यांचा जाहीर सत्कार समारंभ मंडळाचे अध्यक्ष जेष्ठ नेते महादेवराव बक्कम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास महादेवराव बक्कम, शैलेश भोनकर, शांताराम भोरावकर, रामभाऊ टेंबे, काका नवगणे,राजाराम टेंबे,भागोजीबुवा डवले,सुभाष केकाणे, आनंदशेठ यादव, संदीप खरंगटे,रत्नाकर उभारे, राजेंद्र शिर्के,नितीन खडतर,तुकाराम खाडे,कृष्णा पाणवकर,वामन पवार,सखाराम जाधव,काशीराम लहाने, नथुराम पाष्टे, सुभाष गुगळे, टिकम भोनकर,बाळ खरंगटे,सहादेव बक्कम, राघो हर्णेकर,मंगेश पवार,चंद्रकांत उभारे, काशीराम पाखुर्डे,काशीराम पोवार,नंदकुमार उभारे,दत्ताराम पाते,दाजी सावंत आदींसह कुणबी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक महादेवराव बक्कम यांनी केले.

सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये महिलांचे संगीत भजने यामध्ये श्रीराम प्रासादिक महिला भजन मंडळ-चिंचवली(पनवेल) गायिका:वैशाली पाटील(गुरुवर्य रघुनाथ खांडेकर यांची शिष्या),मृदूंगमनी:गणेश पाटील,तबलासाथ:कु.हर्ष पाटील,श्री मंगलमूर्ती महिला भजन:विचुंबे(पनवेल) गायिका:सुप्रिया गोवारी(गुरुवर्य विकसबुवा व मोहनबुवा यांची शिष्या) पखवाज:विकास भगत यांचा बहारदार संगीत भजनांचा कार्यक्रम झाला. रामभाऊ टेंबे यांनी आभार व्यक्त केले.

Exit mobile version