माणगावकरांचा पाणीप्रश्‍न सुटणार

जलजीवन’ अंतर्गत योजनांना मंजुरी
पाणीपुरवठामंत्र्यांकडून प्रशासकीय मान्यतेचे पत्र

। माणगाव । प्रतिनिधी ।
महाड, पोलादपूर माणगाव मतदार संघात करोडो रुपयांच्या जल जीवन मिशन अंतर्गत योजनांना प्रशासकीय मान्यतेचे पत्र पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी आ. भरत गोगावले यांच्याकडे नुकतेच दिले. त्यामुळे या मतदारसंघातील अनेक नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या गावातील पाणी पुरवठा योजनांना मान्यता मिळाल्यामुळे नागरिकांची पाण्याच्या समस्येपासून सुटका होणार आहे.
प्रशासकीय मान्यतेचे पत्र आमदार भरत गोगावले यांच्याकडे पाणीपुरवठा मंत्र्यांनी सुपूर्त केले. त्यावेळी सोबत माजी जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, मांजरोणे मोर्बा विभागप्रमुख शरीफभाई हर्गे उपस्थित होते. यावेळी लोणेरे देवळी 8 कोटी 65 लाख 81 हजार, वारक कुशेडे 5 कोटी 72 लाख 88 हजार, उणेगाव पळसगाव 10 कोटी 10 लाख 74 हजार रुपये मंजूर करण्यात आले असून, कोट्यवधी रुपयांचा निधी आ. भरत गोगावले यांनी माणगाव तालुक्यातील विविध गावांना मंजूर करून आणल्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

Exit mobile version