मंगेश काळोखे हत्या प्रकरण; आरोपींना चार जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

| खोपोली | प्रतिनिधी |

खोपोली शहरासह संपूर्ण रायगड जिल्हा हादरवून टाकणाऱ्या मंगेश काळोखे यांची हत्या करून फरार झालेल्या आरोपींच्या 24 तासांत पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींना पोलीस बंदोबस्तात रविवारी, (दि.28) सायंकाळी साडेचार वाजता खालापूर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 4 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, हत्या केल्यानंतर आरोपी मोबाइल बंद ठेवून अंडरग्राउंड झाल्याने त्यांचा ठावठिकाणा लागत नव्हता, त्यामुळे तांत्रिकदृष्टया कोणतीही उपलब्ध नसल्याने आरोपी शोधण्यासाठी पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. जिल्हा पोलिस अधिक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पाच पोलिसांची पथके तयार करून मुख्य सूत्रधार रवींद्र देवकर यांची पत्नी उर्मिला देवकर, दोन मुले दर्शन, धनेश तसेच मेव्हण्यासह चार संशयित आरोपींना अवघ्या 24 तासांत पकडण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलिसांच्या वेगवान आणि अचूक तपासाची सर्वत्र चर्चा होत आहे.

प्रभारी विशेष पोलीस महानिरीक्षक सो, कोकण परिक्षेत्र, नवी मुंबई भापोसे प्रविण पडवळ पोलीस अधिक्षक आचल दलाल, अपर पोलीस अधिक्षक अभिजीत शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक सुजित गडदे व पथक, सहाय्यक पोलीस मनोज ठाकरे व पथक, पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप व पथक, सहाय्यक पोलिस निरिक्षक संतोष आवटी व पथक पोलीस उपनिरीक्षक मंगेश बाचकर व पथक, पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे व पथक, सपोनि भास्कर जाधव व पथक सपोनी वरोटे व पथक या पोलिस पथकांनी विशेष कामगिरी बजावत आरोपी पकडले आहेत.

Exit mobile version