जन जाग्रुती ग्राहक मंचाच्या जिल्हाध्यक्ष पदी मंगेश माळी

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्राहक स्ंस्था म्हणून नावलौकिक असलेल्या जन जाग्रूती ग्राहक मंच रायगडची त्रैवार्षिक निवडणूक 26 डिसेंबर रोजी पेण गांधी वाचनालय सभागृहात पार पडली. मंचाच्या जिल्हाध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते मंगेश माळी यांची बिनविरोध निवड झाली असुन जिल्हा सचिव पदी खोपोली चे नितिन पाटील तर खजिनदार पदी अलिबागचे विशाल राऊळ यांची वर्णि लागली आहे .
जिल्हा उपाध्यक्षपदी पनवेलचे बी.पी.म्हात्रे, रसायनीचे सुनील वैद्य, पेणचे गणेश जोशी नियुक्ती करण्यात आली. सहसचिव पदी उरणचे परमानंद कलगुटकर , खालापूरचे रामानंदन पाटील, कर्जत सखाराम शिनगे यांची निवड करण्यात आली. तर जिल्हा संपर्क व प्रसिद्धी प्रमुख म्हणून पनवेलचे संतोष विचारे यांची निवड करण्यात आली असून पंचवीस सदस्यांची जिल्हा कार्यकारणी समिती तयार करण्यात आली आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रशेखर मेहर यांनी कामगिरी पार पाडली आहे.

Exit mobile version