उपमुख्यमंत्र्यांपुढे आंबा बागायदारांचे गार्‍हाणे

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तालुक्यातील पावस येथील आंबा बागायतदार संस्थेचे अध्यक्ष प्रकाश यांच्यासह कोकणातील आंबा बागायतदार यांच्या समस्यांसंदर्भात भेट घेतली आहे.
आमदार शेखर निकम व रत्नागिरीचे राष्ट्रवादीचे नेते बशीर मुर्तुझा यांच्या प्रयत्नाने उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात आंबा उत्पादक शेतकर्‍यांच्या विविध प्रश्‍नांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीला कृषिमंत्री दादाजी भुसे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, फलोत्पादनमंत्री संदिपान भुमरे, फलोत्पादन राज्यमंत्री आदिती तटकरे, शेखर निकम आदी उपस्थित होते.
आंबा बागायतदार यांच्या समस्या मांडण्यासाठी कोकण संघाचे उपाध्यक्ष, रत्नागिरी जिल्ह्यातील कार्याध्यक्ष पावस परिसरातील आंबा उत्पादकांचे अध्यक्ष बैठकीला हजर होते. कोकण संघाचे संघाचे उपाध्यक्ष व जिल्ह्याचे कार्याध्यक्ष प्रकाश साळवी यांनी आजतागायत सरकारने कर्जावरील व्याज शेतकर्‍यांना मिळाले नसल्याचे सांगितले. या विषयावर चर्चा करण्यात आली.

Exit mobile version