मानिवली शाळेला हुतात्मा हिराजी पाटील यांचे नाव

शाळेच्या शिक्षण परिषदेत ठराव; सामिती अध्यक्ष जितेंद्र पाटील यांचा पुढाकार

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील हुतात्मा हिराजी पाटील यांचे जन्मगावी असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेला हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी करणारा ठराव केंद्र स्तरीय शिक्षण परिषदेत घेण्यात आला. मानिवली जिल्हा परिषद शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जितेंद्र गवळी यांची नियुक्ती झाल्यानंतर हा ठराव घेण्यात आला आहे. हा ठराव तात्काळ कर्जत तालुका शिक्षण अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आला असून, जिल्हा परिषदेच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे.

कर्जत तालुका पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या दहिवली तर्फे वरेडी केंद्र स्तरावरील शिक्षण परिषद हुतात्मा हिराजी पाटील यांचे जन्मगाव असलेल्या मानिवली येथे घेण्यात आली. त्यावेळी केंद्रप्रमुख नारायण सोनावणे यांच्यासह ग्रामपंचायत्‌‍‍ माजी सरपंच तुषार गवळी, लहूदास डायरे, जितेंद्र गवळी, प्रमिला गवळी आदींसह शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते. त्या ठिकाणी मानिवली जिल्हा परिषद शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या बैठकीत शाळेला हुतात्मा हिराजी पाटील यांचे देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.त्यानंतर मानिवली येथील जिल्हा परिषद शाळेचे नाव “रायगड जिल्हा परिषद वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील शाळा मानिवली असे करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रप्रमुख नारायण सोनवणे यांनी दिली. आता हा प्रस्ताव दहिवली केंद्र प्रमुख यांच्याकडून कर्जत तालुका गटशिक्षण अधिकारी यांना पाठवण्यात आला.
शालेय व्यवस्थापन समितीचा कार्यकाल पूर्ण झाला असल्याने समिती पुनर्गठित करण्यासाठी पालक सभा घेण्यात आली. त्यात जितेंद्र गवळी यांना शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष करण्यात आले तर उपाध्यक्ष म्हणून प्रवीण डायरे यांची नियुक्ती सर्वानुमते घेण्यात आली. शालेय व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून सदस्य म्हणून तुषार गवळी,सुषमा किरण कराळे,प्रिया प्रवीण डायरे, अस्मिता देविदास डायरे, चंद्रकांत डायरे, हर्षदा गवळी, अर्चना अतुल कराळे, मेघा भारत भोईर, प्रमिला हिरामण गवळी, राजू डायरे, मनीष रावजी पाटील हे पालक तर शिक्षक प्रतिनिधी म्हणून संज्योती संतोष कांबरी, शिक्षण तज्ञ म्हणून लहूदास डायरे, विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून साई गवळी, श्रेया गवळी, सदस्य सचिव म्हणून शाळेचे मुख्याध्यापक परशुराम राठोड यांची नियुक्ती करण्यात आली.

Exit mobile version