| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण पूर्व विभागातील बोरखार गावाच्या रहिवाशी मंजुळा रामभाऊ डाकी या अनेक वर्षे धवळ गीत अर्थात धवळारीणीचे कार्यक्रम करत आहेत. याची दखल घेऊन द्रोणागीरी स्पोर्ट्स अकॅडमी उरण या संस्थेने मंजुळा डाकी यांना यंदाचा द्रोणागीरी भूषण पुरस्कार प्रदान केला. याप्रसंगी मा. माजी आमदार मनोहर भोईर द्रोणगिरी स्पोर्ट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष मा. महादेव घरत, माजी जि. प सदस्या वैशाली घरत, महेंद्र घरत, जिल्हा अध्यक्ष काँग्रेस, मनोज पडते, मनोहर गोरे, माजी नगरसेवक जदमुल्ला, अभिनेत्री सरीता कदम, काजळ घाडगे, प्रज्ञा म्हात्रे, यशवंत ठाकूर, मनोहर सिंग या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत मंजुळा डाकी यांना सन्मानचिन्ह प्रशस्ती पत्रक शाळ श्रीफळ देऊन सन्मानित केले. या पुरस्काराबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदन करण्यात नयेत आहे.







