सिकंदर शेख ‘भीमा केसरी’चा मानकरी

| टाकळी सिकंदर | वृत्तसंस्था |

‘भीमा केसरी’ होण्याचा मान पैलवान सिकंदर शेख याने पटकावला. पंजाब केसरी प्रदीपसिंग जिरगपूरला चितपट करत सिकंदर शेखने दुसऱ्यांदा भीमा केसरी किताब घेण्याची किमया केली.

राज्यसभा खा. धनंजय महाडिक यांच्या हस्ते मानाची चांदीची गदा देत सिकंदर शेख याचा सन्मान करण्यात आला.

या स्पर्धेचे आयोजन भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांनी केले होते. भीमा केसरीच्या किताबासाठी झालेल्या लढतीत दोन्ही ही पैलवान हे तुल्यबळ होते. पंजाब केसरी विजेता प्रदीपसिंग जिरगपूर विरुद्ध महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख अशी कडवी झुंज झाली. 15 व्या मिनिटाला वेगवान आणि आक्रमक कुस्ती खेळणाऱ्या सिकंदर पुढे प्रदीपसिंगचा निभाव लागला नाही. प्रदीपसिंगला चितपट करून सलग दुसऱ्यांदा भीमा केसरी होण्याचा बहुमान सिकंदर शेखने पटकाविला.

Exit mobile version