|छत्रपती संभाजीनगर |वृत्तसंस्था|
मराठा आरक्षणावर उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांची तब्येत अचानक खालावली आहे. डॉक्टरांकडून जरांगे यांची तपासणी सुरू असून त्यांना पुन्हा एकदा सलाईन लावली आहे. तसेच जरांगे यांच्या हृदयाची तापासणीही करण्यात येत आहे. शुक्रवारी बीड दौऱ्यापासून जरांगे यांना अस्वस्थ वाटत असल्याची माहिती आहे.गेल्या काही दिवासांपासून मनोज जरांगे यांची दगदग वाढली असल्याने त्यांची तब्येत खालावली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. मनोज जरांगे यांची सध्या ईसीजी आणि टूडी इको चाचणी करण्यात येत आहे.