15 नोव्हेंबर पासून महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात
। छ. संभाजीनगर । वृत्तसंस्था ।
मराठा आरक्षणासाठी सरकारला 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिल्यानंतर, मनोज जरांगे तिसऱ्या टप्प्यात पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याला 15 नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मनोज जरांगेंनी आपल्या तिसऱ्या टप्प्यातील महाराष्ट्र दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. दि.15 ते 23 नोव्हेंबर असा राज्याचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते गावागावात सभा घेणार असून एकूण 6 टप्प्यात हा दौरा असणार आहे. या दौऱ्यात जरांगे हे ठाणे, पालघर, नाशिक, त्र्यंबकेश्वर, नेवासा, संगमनेर आणि श्रीरामपूर यासह अनेक ठिकाणी भेट देणार आहे. सोबतच 1 डिसेंबरपासून राज्यातील प्रत्येक गावागावात साखळी उपोषण केले जाणार असल्याचे जरांगे म्हणाले आहे.
मनोज जरांगेंचा महाराष्ट्र दौरा 15 नोव्हेंबर:- अंतरवाली सराटी, वाशी, परांडा 16 नोव्हेंबर:- करमाळा, दौंड 17 नोव्हेंबर:- मायणी, सांगली, कोल्हापूर, इस्लामपूर 18 नोव्हेंबर:- कराड, सातारा, मेढा, वाई 19 नोव्हेंबर:- पाचाड ते रायगड, रायगड-मुळशी-आळंदी 20 नोव्हेंबर:- आळंदी, तुळापूर, पुणे, खालापूर 21 नोव्हेंबर:- कल्याण, ठाणे, पालघर 22 नोव्हेंबर:- त्रंबकेश्वर, विश्रांतं, संगमनेर 23 नोव्हेंबर:- श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव, धोंडराई