। म्हसळा । वार्ताहर ।
तालुका पाचगाव आगरी समाजाचे संस्थापक सदस्य, तोंडसूरे गावचे माजी सरपंच, सामाजिक, शैक्षणीक आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनिय काम करणारे मनोज कमलाकर नाक्ती यांचे बुधवारी (दि.8) निधन झाले. निधना समयी त्यांचे वय वर्षे 75 होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, मुलगी, जावई, सुना, नातवंडे आणि आप्तेष्ट परिवार आहे.म्हसळा तालुक्यात शिवसेना पक्षाचे गणाचे विभाग प्रमुख, तोंडसुरे सरपंच, जिजामाता शिक्षण संस्थेचे संचालक, तीन वाडी तंटामुक्त अध्यक्ष म्हणून कार्यरत होते.