| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
बैंक ऑफ इंडिया पुरस्कृत आरसेटी रायगड मार्फत प्रशिक्षित मानसी पाटील गागोदे पेण ह्यांनी राज्यस्तरीय आयोजित आणि बँक ऑफ महाराष्ट्र पुरस्कृत कौशल्य आणि ज्ञान स्पर्धामध्ये शिवणकला विषयातून सहभाग घेऊन विभागीय तसेच राज्य स्तरावर पहिला क्रमांक मिळविला आहे. सदर स्पर्धा राज्यस्तरीय असून स्पर्धेमध्ये एकूण 4 विषयांमध्ये राज्यातून 24 प्रशिक्षणार्थीनी सहभाग घेतला होता. सदर राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन सोलापूर आरसेटी येथे झाले असून शिवणकाम या विषयातून मानसीपाटील विजेत्या म्हणून घोषित करण्यात आल्या होत्या. मानसी पाटील यांनी आरसेटी रायगड आणि बँक ऑफ इंडिया रायगड विभागाचे नाव लौकिक आणले यासाठी बँकेच्या विभागीय प्रमुख शंपा बिस्वास, उपविभागीय प्रमुख जॉन लोबो,आरसेटी संस्थेचे संचालक सुमितकुमार धानोरकर यांच्या मार्फत अलिबाग येथे सत्कार करण्यात आला.