महाडमध्ये मनुस्मृती दहन; स्मृती दिन साजरा

| महाड | प्रतिनीधी |

महाड क्रांतीभूमीत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती ग्रंथाची होळी केली होती. या दिनाचा 96 वा स्मृतिदिन महाडमध्ये सोमवार 25 डिससाजरा झाला. बौद्धजन पंचायत समिती आणि विकास वंचित महिला मंडळाच्या वतीने महाड क्रांतीस्तंभाजवळ सभा घेण्यात आल्या. महाड क्रांतीभूमीत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 साली मनु रचित मनुस्मृती हा ग्रंथ जाळून टाकला. या ग्रंथाने समाजातील तळागाळातील समाजाला विकासापासून वंचित ठेवण्यात आले होते. शिवाय महिलांवर अन्याय होईल अशा प्रकारे बंधने घालण्यात आली होती. या मनुस्मृती दहन दिनाचा 96 वा स्मृतिदिन आज साजरा करण्यात आला. वंचित विकास महिला मंडळाच्या डॉ. प्रमिला संपत या गेली 20 वर्षापासून महिला मुक्ती दिन म्हणून देखील साजरा करत आहेत. यामुळे आज महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. प्रमिला संपत यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी महाड शहरातून घोषणा देत क्रांतीस्थंभ गाठले.

Exit mobile version