| सोगाव | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील मापगाव येथील गावदेवी क्रीडा मंडळ आयोजित मापगाव प्रीमियर लीग रविवारी (दि.29) अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात पार पडली. या भव्य लीगची सुरुवात येथील दत्त मंदिरात पारंपरिक पद्धतीने श्रीफळ वाढवून व छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर गावातील मुख्य मार्गाने क्रीडांगणाकडे भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये मान्यवर, ग्रामस्थ, महिलावर्ग आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या स्पर्धेचे उद्घाटन मापगावचे माजी सरपंच सुनिल थळे, सचिन घाडी, सुचित थळे, चंद्रकांत खोत, परेश सुर्वे, संजय शिंदे, विवेक जोशी, साहिल कूर तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. या स्पर्धेत राजवीर 11 संघाने प्रथम क्रमांक पटकावला असून एस.के. वॉरियर्स मापगाव संघाने द्वितीय क्रमांक मिळवला. मापगाव प्रीमियर लीगमुळे गावातील तरुणांना एकत्र येण्याची, क्रीडागुणांना वाव देण्याची आणि एकोपा वाढवण्याची सुंदर संधी मिळाली. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल गावदेवी क्रीडा मंडळाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
मापगाव प्रीमियर लीग उत्साहात
