नांदगाव येथे मराठा भवन भूमीपूजन सोहळा

। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
नांदगाव विभाग मराठा समाजासाठी जिल्हा परिषद सदस्य सुरेश खैरे यांच्या प्रयत्नातून आ.जयंत पाटील यांच्या निधीतून दहा लाख रुपये नांदगाव विभाग मराठा समाजाच्या भवनासाठी मंजूर करून आणले. त्याच्या भूमिपूजनाचा सोहळा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून नांदगाव येथे सुरेश खैरे यांच्या हस्ते करण्यात आले.
नांदगाव विभाग मराठा समाजासाठी एक वास्तू असावी ही सर्व समाज बांधवांची मागणी होती. तिचे भूमिपूजन झाले त्याचे आनंद होत आहे. गेल्या दोन वर्षात नांदगाव विभाग मराठा समाज एकत्र आल्यामुळे समाजाचे प्रश्‍न मार्गी लावण्यात यश आले आहे. जुन्या रूढी परंपरा नष्ट करून समाजाला वैचारिक दृष्टिकोन बदलत चालला आहे. समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी कॅलेंडर छपाई करून आर्थिक उत्पन्नात वाढण्यासाठी प्रयत्न केला असे प्रास्ताविकमध्ये सुधीर सावंत यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुरेश खैरे, सुधागड तालुका मराठा समाज अध्यक्ष गणपत सीतापराव, नांदगाव विभाग मराठा समाज मा अध्यक्ष आत्माराम बेलोसे, नांदगाव विभाग मराठा समाज अध्यक्ष बालाजी सावंत, बांधकाम समिती अध्यक्ष संजय हुले, कॅलेंडर समिती अध्यक्ष विजय धानूधरे, मराठा बसमाजाचे पदाधिकारी, पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, तालुक्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा आणि उत्कृष्ट सूत्रसंचालन आनंत खैरे यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार रोहन दगडे यांनी केले.

Exit mobile version