। महाड । प्रतिनिधी ।
मराठा समाज महाड आयोजित मराठा प्रीमिअर लीग ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत मराठा किंग संघ विजेता ठरला, तर मराठा ब्लास्टर या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. लीग पद्धतीने मर्यादित षटकांची ही स्पर्धा चिचकर मैदानावर खेळविण्यात आली. भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आल होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक आकर्षक चषक, द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमाकांनाही आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेचा मालिकावीर सिद्धेश पाटेकर, उत्कृष्ट फलंदाज अमेय भऊड, उत्कृष्ट गोलंदाज अंकीत जाधव आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण साहिल भऊड यांना आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचा बक्षीस समारंभ नगरसेवक संदीप जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.
या स्पर्धेकरिता नगरसेवक संदीप जाधव यांच्याकडून सर्व संघांना टी शर्ट, सिद्धेश पाटेकर यांनी ट्रॉफी, मितेश पाटेकर यांनी रोख रक्कम पाच हजार, सनी पाटेकर कोल्ड्रिंक्स व पिण्याचे पाणी, संकेत लाड चहा-नाश्ता, अंकीत जाधव चेंडू, तर संदीप यादव, रोहित घवै, अभिजित जाधव, ओंकार पाटील, राहुल जाधव, सुयोग निकम, सागर निकम, प्रतिक कदम, शिवराज सतेरे, मोहनिस पाटेकर, सागर पाटेकर आदी समाज बांधवांनी आर्थिक मदत केली. स्पर्धा यशस्वी होण्याकरिता अंकीत जाधव, संकेत लाड, सनी पाटेकर, सिद्धेश पाटेकर, प्रतिक कदम, अमेय भुवड, साहिल भुवड यांनी मेहनत घेतली. या स्पर्धेकरिता रवी पाटील, अजित घबै, विकास लाड, पूजा जाधव, शीतल फंडणे, वर्षा फाळके आदींनी सदिच्छा भेट दिली, तर संपूर्ण स्पर्धेचे समालोचन मनोज वगरे, अजित अवसरे यांनी केले.