मराठा आरक्षण उपोषणाला रायगडातील कार्यकर्ते जाणार

| रसायनी | वार्ताहर |
मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात छत्रपती संभाजीराजे 26 फेब्रुवारीपासून आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार आहेत. या उपोषणात रायगड जिल्ह्यातून रसायनीसह आसपासच्या परिसरातील हजारो मराठा बांधव राजेंना पाठींबा देण्यासाठी आझाद मैदानावर उपस्थित राहतील असे कृष्णा महाराज लांबे व महादेव महाराज मांडे यांनी टाकेदेवी मंदिर दांड फाटा रसायनी येथे झालेल्या बैठकीत सांगितले.

उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज वारकरी संप्रदायातील वारकर्‍यांची बैठक टाकेदेवी मंदिर दांडफाटा येथे संपन्न झाली. यावेळी विनोद साबळे, गणेश कडू, राजेश लाड, सुनील पाटील, कृष्णा महाराज, लांबे महाराज, महादेव महाराज मांडे मारुती महाराज पाटील, अमित यादव, किशोर देवघरे, अशोक महाडिक, मनोज पवार, महादेव कचरे, प्रकाश पालकर, अमोल जाधव, अतिश साबळे, इसांबे सरपंच पल्लवी विकास देवघरे, राकेश खराडे, पाताळगंगा प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मारुती पाटील, माजी सभापती रमेश पाटील, सागर सुखदरे आदी सह मराठा बांधव हजर होते.

Exit mobile version