मराठा आरक्षण : 12 जानेवारीला सुनावणी

। मुंबई । वृत्तसंस्था ।
मराठा आरक्षणासंदर्भात 12 जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार असून या सुनावणीत मराठा समाजाच्यावतीने विनोद पाटील हे महत्त्वाचा मुद्दा मांडणार आहेत. लोकसभेच्या अधिवेशनात आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला देण्यात आला असून हाच मुद्दा विनोद पाटील सुप्रीम कोर्टात उपस्थित करणार आहेत. मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर विनोद पाटील यांच्यावतीने पुनर्विचार याचिका ाखल करण्यात आली होती. या याचिकेसंदर्भात 12 जानेवारी रोजी न्यायमूर्तींच्या दालनात सुनावणी होणार आहे.

Exit mobile version